Thursday , March 5 2026
Breaking News

बेकिनकेरे येथे सेवानिवृत जवानाचा सत्कार

Spread the love

बेळगाव : देश सेवेतून निवृत्त झालेल्या बेकिनकेरे येथील भरमा आण्णाप्पा यळ्ळूरकर यांचा माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने आज बुधवारी आयोजित नागरी सत्कार उत्साहात पार पडला.
बेकिनकेरे गावातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ता. पं. उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे होते. व्यासपीठावर ग्रा. पं उपाध्यक्षा गंगुबाई गावडे, सदस्य जोतिबा धायगोंडे, बळवंत भोगण, आश्विनी गावडे, आण्णाप्पा यळ्ळूरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना यल्लाप्पा गावडे यांनी सैन्यात काम करणे इतके सोपे नाही, त्यासाठी घर व कुटूंबाचा त्याग करावा लागतो असे सांगून गावातील मोठ्या संख्येने सैन्यात भरती होणार्‍या तरुणांमुळे बेकिनकेरे गावाला सैन्याचे गाव म्हणून ओळखले जाते, असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना निवृत्त जवान भरमा यळ्ळूरकर यांनी फार कष्टातून सैन्यात भरती होऊन देशाची सेवा केली आहे. यापुढे गावातील तरूणांना सैन्य दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.
तसेच माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी हातभार लावणार आहे असे स्पष्ट केले. गंगुबाई गावडे व गजानन मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सैनिक संघटनेने श्रीलक्ष्मी मंदिराच्या जिर्णोद्धारसाठी दीड लाख रुपयांची भरीव देणगी दिली.
कार्यक्रमास माजी संघटनेचे अध्यक्ष मल्लाप्पा बेळगावकर, सदस्य राजू गावडे, विनायक हुंद्रे, चंद्रकांत गावडे, नारायण भोगण, नामदेव भोगण, बाळाराम सावंत, यल्लाप्पा मोरे, रामा भोगण, पप्पू कोळी, यल्लाप्पा बिर्जे, अरुण सावंत, मनोरमा लोखंडकर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव पाटील यांनी केले, तर आभार कुमार सातेरी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *