Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यात 17 लाख रोप लागवडीचे उद्दिष्ट

Spread the love

बेळगाव : शासनाच्या कोटीवृक्ष अभियान अंतर्गत जिल्हा पंचायत फलोत्पादन खाते, वन खाते, सामाजिक वनीकरण खात्याच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एक कोटी वृक्षारोपण केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून यावर्षी 17 लाख 2 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. विविध सरकारी कार्यालयाचे आवार, सरकारी शाळा, जिल्ह्यातील एपीएमसी आवार, स्मशानभूमी, जंगल प्रदेश शेती, बागायत महसूल खात्याच्या मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्या दुतर्फा ही रोपे लावण्यात येणार आहेत.
जिल्हा पंचायतीने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यासाठी 16 लाख खड्डे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी  नऊ लाख चाळीस हजार खड्डे खणण्यात आले असून 2 लाख 50 हजार खड्ड्यात रोपे लागवड करण्यात आली आहेत. आता उर्वरित खड्ड्यांमध्ये ही रोपे लावण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिना अखेरीपर्यंत वृक्षारोपणाचे काप पूर्ण करण्याचे जिल्हा पंचायतीचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातून फळझाडांच्या रोपांच्या मागणीला जोर आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *