बेळगाव : समाजाचे प्रती आपलेही काही तरी कर्तव्य आहे हे समजून जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी आज उड्डाण पुलाची स्वच्छता केली.
आज सकाळी उड्डाण पुलावर जमला कचरा व पुलावर उगवलेले काँग्रेस गवत तसेच अनेक विषारी वनस्पती ज्याचा धोका सकाळी मॉर्निंग वॉकला येणार्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना होत होता. कोणाला त्यामुळे काही अपायकारक घटना होण्याअगोदरच प्राईड सहलीच्या सर्व सदस्यांनी उड्डाणपुलावरील काँग्रेस गवत व विषारी वनस्पती काढल्या. या वनस्पतीमुळे पुलाला सुद्धा धोका पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राईड सहेली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमून तेथील कचरा महापालिकेच्या वाहनात भरून पाठवून देण्यात आला आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे आपले संविधान चर्चा सत्राचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. …