Thursday , March 5 2026
Breaking News

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

Spread the love

 

द. म. शि. मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेची बैठक
बेळगांव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजची शिक्षण पद्धती ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारलेली असून तिच्यामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. माणसाला जगण्यासाठी व जीवनासाठी शिक्षणामधून ज्ञान मिळाले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन कार्याची व्याप्ती तयार केली पाहिजेत. शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, व्यवस्थापक पदाधिकारी शहराबरोबरच ग्रामीण भागाकडे स्वतः होऊन जबाबदारीने विकास घडवून आणण्यासाठी पाहायला हवे; गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजचे विद्यार्थी आणि शिक्षक पालक उद्याचे आदर्श नागरिक घडविणार आहेत म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतीमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचे कार्य प्रामाणिकपणाने करावे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह त्यांच्यातील विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीकरणे महत्वाचे आहे. खेडोपाडी अनेक चळवळी उभ्या करून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची जबाबदार नागरिक म्हणून आम्हाला सर्वांना कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य – कल्याणसाठी चळवळ : दिशा देणारे कार्य एक चिंतन या विषयावर ते बोलत होते.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, माजी विद्यार्थी संघटना आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या जिमखाना सभागृहात शनिवार दिनांक 09 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी माजी विद्यार्थी समन्वयक स्वागत प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी केले. प्रास्ताविक भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. परिचय प्रा. नारायण तोराळकर यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. एन. एन. शिंदे यांनी केले तर सरस्वती हायस्कूल हंदिगनुरचे ज्येष्ठ मुख्याध्यापक जी. एस. पाटील यांनी आभार मानले. यावेळी यावेळी प्राचार्य आनंद पाटील, प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे, प्रा. डॉ. बी आय. वसुलकर, चार्टड अकाऊंट सुरेन्द्र एस. बरगावकर, डी. बी. पाटील, अनिल कणबरकर यांनी परिवर्तनात्मक विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता उपाय योजना संदर्भात मौलिक विचार मांडले.
यावेळी अ‍ॅड. ए. आर. पाटील, महादेव नार्वेकर, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. नितीन घोरपडे, प्रा. दिलीप वाडेकर, प्रा. अमित सुब्रमण्यम, प्रा. संजय बंड, प्रा. राजाराम हलगेकर, मनोहर हुंदरे, बी. जी. गाडेकर, के. के. पन्हाळकर, जी. जी. पाटील, शिवाजी शिंदे, अनिल पाटील, मनोज मोरे, दिपक पावशे, आनंद गोरल, प्रा. लक्ष्मण बांडगे, ए. व्ही. सुतार, गुरूप्रसाद गुंजिकर प्रा. राघवेंद्र माळवडेकर तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *