Wednesday , December 10 2025
Breaking News

ग्रीन कॉरिडॉरने हृदय प्रत्यारोपणासाठी आणले बेळगावात

Spread the love

बेळगाव : एका अपघातामुळे धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये जीवन–मृत्यूच्या संघर्षात झुंजणाऱ्या १५ वर्षीय मुलीने अवयवदान करून ४ जणांचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अपघातात मेंदूला इजा झाल्याने धारवाडच्या रुग्णालयात दाखल झालेल्या १५ वर्षांच्या मुलीच्या हृदयाचे बेळगावातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल एका रुग्णावर प्रत्यारोपणाचे नियोजन आहे. त्यामुळे धारवाड येथून ग्रीन कॉरिडॉरद्वारे रस्तामार्गे हृदय बेळगावला आणण्यात आले. हुबळी येथील एसएडीएम हॉस्पिटल आणि तत्त्वदर्शन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला किडनी प्रत्यारोपित करण्यात आली, तर यकृत बेंगळुरूच्या शेषाद्रिपुरम येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. पोलिसांनी शून्य रहदारी किंवा ग्रीन कॉरिडॉर (ग्रीन लेन) मधून मृतदेह हलविण्यास सहकार्य केले.

मेंदू आता कार्य करत नसला तरी अवयव कार्य करत होते. मेंदू विकलांग मुलीचे आई-वडील आणि कुटुंबीयांशी डॉक्टरांनी सविस्तर सल्लामसलत केली आणि तुमच्या मुलीने दान केलेले अवयव दुसऱ्याचे प्राण वाचवतील, असे सांगताच कुटुंबातील सदस्यांनी स्वेच्छेने अवयव दान करण्यास होकार दिला. तर मेंदूचा निष्क्रिय झालेल्या मुलीचे हृदय केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात दाखल असलेल्या गोकाक तालुक्यातील २२ वर्षीय तरुणावर प्रत्यारोपणासाठी आणण्यात आले आहे. डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. मोहन गण, डॉ. आनंद वागराळी आणि त्यांची टीम आता या कामात व्यस्त आहे.होय, त्या मुलीचा मृत्यू झाला असला तरी, मरणानंतरही तिने 4 लोकांचे प्राण वाचवले आहेत. अवयव दान केल्याने संबंधित रुग्णांचे कुटुंबीय त्या मुलीचे कृतज्ञ आहेत. बेळगाव व हुबळी पोलीस विभागाचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. मुसळधार पावसात भिजताना मृतदेह लवकर बाहेर काढता यावा यासाठी सर्वात गजबजलेल्या रस्त्यावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. अवयव दान करणारी मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे, पोलिसांचे, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली व व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *