नामदेव देवकी संस्थेतर्फे तीन दिवसीय कीर्तनमाला
बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त शहापूर येथील नामदेव दैवकी संस्था आयोजित नामदेव विठ्ठल मंदिरात तीन दिवसीय कीर्तनमाला उत्साहात पार पडली. पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संवादिनीसाथ श्री. वामन वागुकर यांनी तर पकवाजाची साथसंगत श्री. यशवंत पांडुरंग बोंद्रे यांनी केली.
‘अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा…’ या नामदेवांचा अभंग शेवटच्या निरुपणासाठी घेतला होता. भक्तीमार्ग एकच पर्याय आहे. हरिचिंतनात जीवनात व्यतित करावे, असे बुवा म्हणाले.
नामदेव देवकी संस्था शहापूरचे हभप मारुती होमकर यांनी शाल, श्रीफळ, हार अर्पण करुन बुवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्री. वागुकर यांचा विनायक काकडेंच्या हस्ते तर श्री. बोंद्रे यांचा गौरव सूर्यकांत गायडोळे यांनी शाल, श्रीफळ देऊन आला.
वेदशास्त्र संपन्न वासुदेव छत्रे गुरुजी, कॅनरा बँकेचे मॅनेजर दिलीप मळगी, राघव हेरेकर, प्रकाश चिकदीनकोप्प, रामचंद्र एडके यांचाही यावेळी बुवांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कीर्तनमाला यशस्वी करण्यासाठी हभप तुकाराम इटगीकर, हभप गिरीश जोशी, हभप सुधीर बोंद्रे, हभप मनोहर पंत पाटुकले व नामदेव देवकी संस्थेचे अध्यक्ष सतीश हावळ व सर्व पदाधिकार्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. या कार्यक्रमात कुमारी श्रीनिधी यांनी भक्तिगीते सादर केली.
Belgaum Varta Belgaum Varta