
बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या घरी जाऊन भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, येडियुराप्पा हे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांचे मार्गदर्शन आणि समाजाच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली. येडियुरप्पा यांनी यावेळी त्यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta