बेळगाव : गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने साईज्योती सेवा संघाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संघातर्फे बहुमान वितरण करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना साईज्योती सेवा संघाच्या अध्यक्षा ज्योती निलजकर म्हणाल्या की, गुरूंमुळे आपण घडलो आहे. गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणे गरजेचे आहे.
या बक्षीस वितरण सोहळ्यास ज्योती बाके, सुमंगला पुजारी, शितल पाटील, विणा चौगुले, सारिका सिंदगी, श्रुती येळ्ळूरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हेमावती कुलकर्णी व इतर शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta