बेळगाव : वॉर्ड क्रमांक 44 मधील नगरसेवक आनंद चव्हाण यांनी लेले ग्राउंड परिसरातील रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविले. बेळगाव शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे या रस्त्यावर छोटेमोठे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनधारक जीव मुठीत घेऊन या भागातून ये- जा करीत होते. ही बाब वॉर्ड क्रमांक 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या वॉर्ड मधील लेले ग्राऊंड परिसरातील खड्डे बुजविले. यावेळी त्यांचे सहकारी श्री. दयानंद हिशोबकर, अनुप माळी, मोहन चाटे, वसंत हेब्बाळकर यांचे सहकार्य लाभले. नगरसेवक चव्हाण यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta