चिकोडी : चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे दूधगंगा नदीपात्रावर वाहन चालकाचा ताबा सूटून एरटीगा कार नदीत पडली. पुण्याहुन भाडे घेऊन बेळगावाला गेलेली एमएच 09 यु एफ 5087 क्रमांकाची एर्टीगा कार, भाडे सोडून परत पुण्याकडे जात होती. सदर गाडी आज (दि.15) पहाटे एकसंबाकडून दानवाडकडे जात असताना एकसंबा – दानवाड पुलानजीक वळण घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटुल्याने थेट गाडी दूधगंगा नदीच्या पात्रात घुसली.
दरम्यान, यावेळी गाडीतील चालक काचा फोडून बाहेर पडून आपला जीव वाचविला. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. सदर घटनेची माहिती प्रथम दानवाड गावातील रहिवासी वंदना भरमगौडा पाटील या पहाटे वॉकिंगसाठी जात असताना नदीत कारगाडी पडल्याचे आढळून आले. त्यांनी गावातील नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढली. गाडीचालकाचे नाव समजू शकलेले नाही.
सद्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पण या पुलावर बॅरिकेड्स नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होते.
Belgaum Varta Belgaum Varta