
बेळगाव : शनिवार दि. 16/07/2022 रोजी सकाळी हेस्कॉमच्या वतीने विद्युत्त अदालत संपन्न झाली. यावेळी अवचारहट्टी गावामधील विजेच्या संदर्भात गावातील नागरिकांनी व येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांनी गावामधील विविध विद्युत्त समस्या मंडल्या. शेतातील विद्युत्त खांब व्यवस्थित करून देणे, विजेचे जूने खांब बदलून नवीन खांब बसविणे, गावातील खासगी जागेत असलेले टीसी (ट्रान्सफार्मर) सरकारी हद्दीत बसविणे, गावातील यरमाळ रोड शेजारी असलेल्या सोमनाथ मंदिरमध्ये खांबावरुन केबल घालून नवीन मीटर बसविणे, गावच्या स्माशनभूमीत विजेची सोय करणे आशा प्रकारच्या सूचना हेस्कॉमकडे मांडण्यात आल्या. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी येळ्ळूर गावची हेस्कॉमची लाईट बिल तसेच बाकी सर्व बिल ही 100% भरलेली आहेत. आज पर्यंत कोणतीही थकबाकी नाही आपण सुद्धा विजेच्या संदर्भातील सर्व कामे 100% पूर्ण करून द्यावीत अशी सूचना केली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य कल्लाप्पा मेलगे, हेस्कॉम अधिकारी पवन कुमार AE , शीतल संदी AE,आय डी लोबो S/O, रामलिंग बेळगावकर A/O व लाइनमन गौंडवाडकर व मोहन तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta