बेळगाव : 21 जुलै रोजी नवलगुंद परिसरातील लिंगराज सर्कल येथे 42 वा शेतकरी हुतात्मा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धगौडा मोदगी म्हणाले, शेतकरी हुतात्मा दिन हा संपूर्ण देशातील शेतकरी चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या 42 वर्षांपासून नरगुंद – नवलगुंद येथे साजरा केला जाणारा शेतकरी शहीद दिन अतिशय यशस्वी ठरत आला आहे. याचप्रमाणे 21 जुलै रोजी भारतीय कृषक समाज, अखंड कर्नाटक रयत संघ, कर्नाटक रयत सेना, कर्नाटक राज्य शेतकरी संघ तसेच हसीर सेना, कळसा भांदूर म्हादई शेतकरी संघर्ष संघ, सामूहिक नेतृत्व संघ, कन्नड संघटना, कर्नाटक जनशक्ती आणि कुली, विणकर कर्मचारी संघासह विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हौतात्म्य पत्करलेल्या शेतकर्यांचे बलिदान लक्षात ठेवून शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच सरकारकडून शेतकर्यांवर होत असलेले अन्याय आणि अत्याचाराविरोधात संघर्ष करून लढा देण्याचा आमचा मानस असून शेतकरी हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्यातील 2 हजारहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत, अशी माहितीही सिद्धगौड पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेला विविध शेतकरी नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta