बेळगाव : येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन 24/7 पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येळळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली.
यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळळूरपर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, प्रेशर कमी असणे, पाणी गळती अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या आणि ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी लवकरात लवकर दुरूस्ती करवून घेऊन पुन्हा पाहणी केली.
तसेच गावातली उर्वरित भागात झोन 1, 2, 3, 5, 6 आणि 7 अवचारहट्टी या ठिकाणची पाहणी देखील केली जाणार असून त्या ठिकाणच्या समस्याही जाणून घेतल्या जातील आणि दुरूस्ती काम करण्याबाबत योग्य त्या सूचना कर्मचाऱ्याना दिल्या जातील, असे यावेळी येळळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. त्याचबरबरीने लवकरात लवकर दुरुस्त करून गावातली लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय योग्यरित्या करावी अशी सूचना देखील ग्रामपंचायत अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांना दिली.
यावेळी पाहणी करताना ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, पशराम परीट, रमेश मेनसे, दयानंद उघाडे, पिंटू चौगुले, राकेश परीट, राजू डोण्ण्यान्नवर, सुवर्णा बिजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, जलजीवन मिशनचे पर्यवेक्षक, कर्मचारी, ग्रा.पं. कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta