बेळगाव : कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी विविध संघ संस्थांच्यावतीने आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री दुर्गा माता महिला स्वसहाय्य संघ, मुक्तिधाम, फेसबुक फ्रेंड सर्कल, साहेब फाउंडेशन, प्रोत्साह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वोदय कॉलनी येथे तर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत भारतनगर लक्ष्मी गल्ली सिध्दार्थ बोर्डिंग येथे मोफत आरोग्य चिकित्सा आणि औषध वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी. टी. चेतन तसेच डॉक्टर प्रकाश व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिरात सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि छोट्या मुलांची आरोग्य तपासणी केली, त्याचबरोबर औषधांचे वितरणही केले. दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 400 हून अधिक जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर, डॉ. समीर शेख, प्रणिक हिलिंग सेंटरच्या संचालिका सुषमा पाटील, पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी दुर्गामाता महिला संघाच्या अध्यक्ष पुष्पा अनंतपुर, उपाध्यक्ष लक्ष्मी बुवा, सेक्रेटरी रूपा पिटके यांच्यासह अन्य सदस्य तसेच मुक्तिधामचे विजय सावंत, परशराम पिटके, प्रोत्साहाचे संतोष होंगल, हिरालाल चव्हाण व सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. या शिबिराला माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा पाटणेकर, मालू भंडारे, राहुल पाटील यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली. डॉक्टर बी. टी. चेतन, डॉक्टर प्रकाश व संतोष दरेकर यांचा शिबिरात शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …