Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावची सेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम

Spread the love

 

बेळगाव : बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शहापूर येथील हॉटेल समुद्र येथे घेण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेळगावमधील लोकमान्य टिळक चौक येथे बेळगाव जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माननीय उद्धवजी ठाकरे यांचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला समस्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि ज्येष्ठ शिवसैनिक व आरोग्य विभाग जिल्हा प्रमुख दत्ता जाधव यांनी केले.
या बैठकीला शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी नगरसेवक राजू आजगावकर, बाळासाहेब डंगरले, रिक्षा सेनेचे विजय मुरकुटे, शंकर बिरजे तसेच मंगेश नागोजीचे, सुनील माळवी, विनायक कोवाडकर, प्रकाश हेबाजी, महेश टंकसाळी, निरंजन अष्टेकर, विठ्ठल हुंदरे, अशोक काकतकर यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *