बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकलेला पाहिला नाही, असा टोला आम लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप सरकारच्या हर घर तिरंगा या उपक्रमावर लगावला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप सरकारने आखलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेसंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप आणि आर एसेसवर निशाणा साधलाय. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली. मात्र स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजतागायत आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकविला नसल्याचे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला राजकीय दृष्ट्या आपल्याला पाहायचे नाही, असे मत देखील आमदार हेब्बाळकरांनी व्यक्त केले. आदिवासी महिलेची राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार म्हणाल्या, प्रत्येक गोष्ट हि राजकीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे नाही. विरोधकांनीही हि गोष्ट राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. एका आदिवासी महिलेची राष्ट्रपतिपदी निवड होणे हि चांगली गोष्ट असून मी त्यांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे आमदार हेब्बाळकर म्हणाल्या. सिद्धरामोत्सव या कार्यक्रमासंदर्भात बोलताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, हा राजकीय कार्यक्रम नसून पक्ष आणि सिद्धरामय्या समर्थकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही. सिद्धरामय्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. याकाळात त्यांनी ४० वर्षे राजकारण केले. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार हेब्बाळकर म्हणाल्या.
Belgaum Varta Belgaum Varta