Monday , September 21 2026
Breaking News

इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड लांबवली

Spread the love

इचलकरंजी : इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड असलेली पिशवी मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार आज (दि.२५) हवामहल बंगला रोडवर घडला. शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता सुरेश टाकवडे (रा. तारदाळ) जाणता राजा नावाचा बचत गट चालवतात. या बचत गटासाठी मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम घेण्यासाठी त्या इचलकरंजी येथे आल्या होत्या. ३ लाख ८२ हजारांची रोड असलेली पिशवी हातात घेऊन त्या हवामहल बंगला रोडवर थांबल्या होत्या. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसडा मारून लांबविली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *