Thursday , March 5 2026
Breaking News

सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात बिबट्याचा वावर

Spread the love

 

सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जमिनीवर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याची घटना घडली. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
हे वृत्त समजताच सौंदत्ती विभागीय वन अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पायाचे ठसे शोधून काढले. तसेच, एक विशेष पथक तयार करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावाच्या आसपास बिबट्याचा शोध घेत आहेत. घंटागाडी आणि लाऊडस्पीकरद्वारे इशारा देण्यात आला आहे.
हुलीकट्टी, शिंदोगी, येक्केरी हद्दीत बिबट्याचे दर्शन झाले आहे. अंधार पडल्यानंतर कोणी घराबाहेर पडू नये यासाठी वनविभागाचे अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत आहेत.
वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी तैनात असून बिबट्याचा कसून शोध सुरू आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना धक्का बसला असून लवकरात लवकर बिबट्याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *