बेळगाव : शहरातील टिळक चौक ऑटो रिक्षा ओनर्स असोसिएशनतर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करून अभिवादन करण्यात आले.
टिळक चौक येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करण्यात आले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या मूर्तीचे पूजन परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी केले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याची तसेच बेळगावात झालेल्या त्यांच्या सभेची माहिती दिली.
यावेळी माजी आमदार नंदीहळ्ळी यांचा आयोजकांतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राजू तुडयेकर, राजू मोरे, प्रकाश राऊत, महांतेश हव्यापगोळ, प्रदीप सुतार, अनिल मुतगेकर, महेश कदम, अनिल हंगिरकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta