Friday , March 6 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : पत्रकारिता करणे अत्यंत कठीण असते. प्रसंगी युद्धभूमीवर जाऊन सुद्धा पत्रकारांना वार्तांकन करावे लागते. यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडे कमी आहे, असे उद्गार प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले.
आज बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा 45 वा वर्धापन दिन ‘पत्रकार भवन’ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते. प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले. लोकमान्य टिळकांच्या फोटोला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आज जे देशात चालले आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडविले जात आहेत. अशांतता निर्माण केल्या जात आहेत. याचे परिणाम मुख्यत्वे सामान्य माणसांनाच भोगावे लागतात आणि म्हणून पत्रकारांनी अशा घटनांना किती प्रसिद्धी द्यावी हे ठरविले पाहिजे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पत्रकार संघाच्या वाटचालीचा त्यांनी गौरव केला. संस्था इतकी वर्षे चालविणे ही सोपी बाब नाही पण बेळगावच्या पत्रकारांनी ती साध्य करून दाखविले हे कौतुकास्पद आहे. संघाच्या पुढील वाटचालीसही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुहास हुद्दार, विकास कलघटगी, परशराम पालकर, प्रकाश बिळगोजी, उपेंद्र बाजीकर, शिवाजी शिंदे, डी. के. पाटील, कृष्णा कांबळे, प्रकाश काकडे, गजानन मुचंडीकर, संजय चौगुले, दीपक सुतार, दिनेश नाईक आदी पत्रकार उपस्थित होते.

कार्यवाह शेखर पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *