बेळगाव : माधवपूर वडगाव येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने भागधारकांना ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन अमोल देसाई होते. संघाचे भागधारक व एपीएमसीचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर होसुरकर यांना सल्लागार ज्येष्ठ सभासद श्री. यल्लाप्पा देसुरकर यांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात श्री. अमोल देसाई यांनी संघाबद्दल माहिती देऊन संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रसंगी श्री. मनोहर होसुरकर, संचालक संतोष शिवनगेकर व नितीन खन्नूकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमात प्रसंगी व्हा. चेअरमन श्री. अप्पाजी हलगेकर, संचालक शशिकांत पाटील, रघुनाथ जुवेकर, शहापूरकर, तानाजी भोसले, सल्लागार भाऊ पाटील, देवकुमार बिर्जे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, मनोहर शिरोडकर, डीसीसी बँक टीसीओ श्री. कुरेर, बँक इन्स्पेक्टर अरुण पाटील, धुळपन्नावर, गजानन होसुरकर, जोतिबा भोसले, सेक्रेटरी मल्लिकार्जुन हेब्बाळी, प्रकाश औंधकर, यल्लाप्पा नागोजीचे आदी मान्यवर तसेच सोसायटीचे सर्व कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta