बेळगाव : डिवाईन हेल्पिंग हँड्स ग्रुपच्या वतीने काकती स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये “सांसे हो रही है कम आओ पेड़ लगाए हम” हा संदेश देण्यात आला पर्यावरणासाठी झाडांचे किती महत्त्व आहे. झाडे लावून त्यांचे संगोपन कसे करायचे याची माहिती निसर्गप्रेमींनी दिली.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला चालना हेल्पिंग हँड्सचे गजानन गव्हाणे यांनी दिली. समाजसेवक विनायक केसरकर, वनविभागाचे अरण्य रक्षक संजय गव्हाणे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा सौ. वर्षा मुचंडीकर, सुनिता गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य दादासो सूर्यवंशी, लक्ष्मण कोळेकर, सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष सिद्धाप्पा टुमरी, लक्ष्मण पाटील, भावकांना टुमरी, राजू राऊत, पांडुरंग पवार, सागर कडोलकर, सिद्धू मुचंडी, नितीन मोरबाळे, अनु कांबळे, डॉ. राघवेंद्र जोशी, कुंडलिक उचगावकर, राजाराम ईंजल, विलास ढोले, आशिष गव्हाणे व निसर्गप्रेमी उपस्थित होते.
झाडे लावण्यासाठी जमीन खोदकामासाठी उमेश घानगेर यांचे सहकार्य लाभले.
अशा प्रकारे वृक्षारोपण कार्यक्रमातून तब्बल 30 हून अधिक झाडे लावण्यात आली. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता. जनतेला निसर्गाकडून उपलब्ध असून सुद्धा ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आपल्यावर आली होती. म्हणून आज आम्ही तुम्ही या परिसरासाठी व झाडांसाठी सेवा कार्य केलं पाहिजे, असा संदेश डिवाईन हेल्पिंग हँड्स फाउंडेशन कडून देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta