Friday , March 6 2026
Breaking News

वाहतुकीवेळी ट्रकमधून होणारी तांदळाची नासाडी समाजसेवक संतोष दरेकर यांनी रोखली!

Spread the love
बेळगाव : तालुक्यातील देसूर रेल्वे स्थानकावरून तांदूळ भरलेला ट्रक गणेशपूर गोदामाकडे जात होता. यावेळी पोते फाटून तांदूळ वाटेत पडून वाया जात होता. हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी वाया जाणार्‍या तांदळाची नासाडी रोखली.
तांदूळ रस्त्यावर पडल्याचे पाहून संतोष दरेकर यांनी टिळकवाडीच्या तिसर्‍या रेल्वे गेटपासून ट्रकचा पाठलाग करून ट्रक थांबविला आणि पोत्यातून तांदूळ रस्त्यावर पडून वाया जात असल्याचे ट्रक चालकाला सांगितले. त्यानंतर ट्रक चालकाला तांदूळ पडू नये म्हणून पोते फाटलेल्या ठिकाणी कापडाचा तुकडा ठेवण्यास सांगितले. यावेळी कॅम्प पोलिसही तेथे दाखल झाले. या ट्रकमध्ये 480 पोती तांदूळ होता.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *