बेळगाव : शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण, सीमाभागात हा पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र कामकाज होत नाही. पण, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी संयुक्तरित्या लढा देण्याचे काम सुरूच आहे, असे मत अॅड. राजाभाऊ पाटील यांनी व्यक्त केले. सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात बुधवारी शेकापचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला पक्षाचा ध्वज व लाल बावट्याचे पूजन नारायण जाधव यांच्या हस्ते तर ध्वजवंदन डी. एल. आंबेवाडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे बेळगाव व चंदगड ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी, तालुका चिटणीस एस. एल. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील उपस्थित होत्या.
रामचंद्र मोदगेकर, निंगोजी हुद्दार, दिनकर सडेकर, म्हात्रू झंगरूचे, तृप्ती सडेकर, विट्ठल पाटील, गोविंद जाधव, यल्लाप्पा बांडगी, अशोक पाटील, एस. आर. पाटील, जी. एस. पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर कंग्राळकर तर प्रास्तविक कृष्णा हुंदरे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta