बेळगाव : बेळगाव शहरातील सायबर, इकॉनॉमिक्स ऑफेन्स आणि नार्कोटिक्स अर्थात सीईएन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी संजीव कांबळे यांनी पदभार स्वीकारला आहे.
मावळते पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी कांबळे यांना पदभार सोपवला. गड्डेकर यांची हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
गेल्या दोन वर्षात गड्डेकर यांनी अनेक सायबर गुन्ह्यांचा तपास लावत उत्कृष्ट कामगिरी बजावली होती आता या पोलीस स्थानकाची जबाबदारी संजीव कांबळे यांच्याकडे आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी गडेकरांची बदली झाली होती.
Belgaum Varta Belgaum Varta