बेळगाव : श्रीराम सेनेतर्फे एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निदर्शने करण्यात आली.
श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि पीएफआय या मुस्लिम संघटना देशद्रोही कारवाया करत आहेत. राज्यातील खून आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांवर लवकरात लवकर बंदी घालावी.
निदर्शनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या आंदोलनात श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta