बेळगाव : पोटच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच आईला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी जाधव नगर परिसरात बिबट्याने खणगाव येथील गवंडी काम करणारे सिद्राय लक्ष्मण निलजकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. याची बातमी सर्वत्र पसरताच त्यांची आई शांता निलजकर यांना मानसिक धक्का लागला. त्याचदरम्यान हृदयविकाराचा धक्का लागून त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे खणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta