आ. श्रीमंत पाटील ; मंगसुळीत मंदिर जीर्णोद्धारसह साडेचार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन
अथणी : मंगसुळी गावच्या विकासासाठी तसेच येथील श्री क्षेत्र खंडोबा देवा मंदिरासाठी अधिकाधिक निधी आणून विकास केला जात आहे कर्नाटक महाराष्ट्रसह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ बनवू, असा विश्वास माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नाने मंगसुळीतील – महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र खंडोबा देवालयासाठी साडेचार कोर्टीचे अनुदान मंजूर झाले आहे. येथील परिसरामध्ये विविध विकासकामांना सुरुवात झाली असून मंदिराभोवती बगीचा, प्रवासी मंदिर, दोन मजली समुदाय भवन व तलावामध्ये बोटी सोडण्यात येणार आहेत. या कामांचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आ. पाटील म्हणाले, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे क्षेत्र आधुनिक पद्धतीने परिसरात बगीचा व सुंदर रस्ते समुदाय भवनासह प्रवासी मंदिर, रस्ते व तलावामध्ये बोट सफरीची व्यवस्था करणार असून भाविकांना व पर्यटकांनादेखील येथे सुविधा उपलब्ध करण्यात येतील. भाविकांना सुरळीतपणे दर्शन घेता यावे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. वर्षाच्या आत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. कोणताही निधी कमी पडून देणार नाही. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. कंत्राटदारांनी कामांचा दर्जा राखावा. या विकासासाठी आ. रमेश जारकीहोळी, विजापूरचे खासदार रमेश जिगजिणगी, विजयकुमार पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. यावेळी देवस्थान कमिटीचे प्रमुख सरकार उज्वलसिंह पवार देसाई, विक्रांतसिंह पवार देसाई, अशोक पाटील, माजी तालुका पंचायत अध्यक्ष रवींद्र पुजारी, संभाजी पाटील, सुधाकर भगत, अभयसिंह पाटील, कॉन्ट्रॅक्टर संदीप पाटील (बेनाडी), विजयकुमार पाटील, इंजिनिअर राजेश हेब्बाळ, मुकुंद पुजारी, पुंडलिक पाटीलसह परिसरातील व्यापारी पुजारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta