बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील २२ शाळांना बुधवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाधव नगरमध्ये आढळलेला बिबट्या जेरबंद न झाल्याने जाधव परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
काल रात्री गोल्फ कोर्सवर कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी वाढवण्यात आली आहे. डीडीपीआय बसवराज नलटवाडा आणि शहराचे बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हा आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
सुट्टी जाहीर करण्यात आलेल्या शाळा
हनुमान नगर वरिष्ठ प्राथमिक शाळा,
कुवेंपू नगर कनिष्ठ प्राथमिक शाळा,
सह्याद्री नगर कनिष्ठ प्राथमिक शाळा,
सदाशिवनगर कनिष्ठ प्राथमिक शाळा,
सदाशिवनगर मराठी कनिष्ठ प्राथमिक शाळा,
व्ही.व्ही.नगर वरिष्ठ प्राथमिक शाळा,
कुवेंपुनगर केएलई इंटरनॅशनल स्कूल,
वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, क्लब रोड,
केंद्रीय विद्यालय, कॅम्प,
मराठी विद्यानिकेतन, कॅम्प,
एन पी ईट टी क्लब रोड
सेंट झेविअर हायस्कूल कॅम्प,
टीव्ही सेंटर जीएल पीएस उर्दू शाळा
जाधव नगर, हनुमान नगर, कुवेंपू नगर, विश्वेश्वर नगर, सह्याद्री नगर, दूरदर्शन केंद्र, कॅम्प एरिया, हिंडलगा, विजयनगर येथील शाळा.
याशिवाय हिंडलगा आणि विजयनगरातील 9 ग्रामीण शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta