हिंडलगा : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघातर्फे दि. 10 रोजी सकाळी आठ वाजता हिंडलगा येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रत्येक घरा घरात आपला तिरंगा राष्ट्रध्वज
फडकवावा. शनिवार, रविवार व सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 असे तीन दिवस मोठ्या डौलाने फडकविण्यासाठी मोटरसायकल फेरी काढण्यात आली.
या फेरीचे उद्घाटन यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांच्या हस्ते करण्यात आले, ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे यांनी फेरीत सहभागी असलेल्यांना राष्ट्रध्वज प्रदान करण्यात आला. गावातील प्रत्येक भागात निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी राष्ट्रध्वज लावण्यासाठी विशेष माहिती
दिली. या फेरीत रमाकांत पावशे, ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा काकतकर, प्रवीण पाटील, तुकाराम फडके, अशोक घाटगे, चंद्रकांत माने, जयवंत साळुंके, भरमा कुडचीकर, गणेश तेलकर, श्रीकांत जाधव, राजू कुपेकर, रमेश पावशे यांचा सहभाग होता. गावातील प्रत्येक गल्लीत व कलमेश्वर नगर, श्रीनाथ नगर, विजयनगर, लक्ष्मी नगर, समर्थ नगर, डिफेन्स काॅलनी या भागातून काढली. सर्व भागात या जागृती फेरीचे स्वागत करण्यात आले. फेरीची सांगता लक्ष्मी मंदीर या ठिकाणी झाली.