बेळगाव : गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने देशाचा 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन पुरोहित यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हणून तिरंग्याला वंदन करण्यात आले, यावेळी संस्थेचे संचालक रमेश पाटील, बाबू पावशे, श्रीनाथ बेळवडी, राहुल बेद्रे, संजय पाटील, चंद्रकांत मेलगे, संतोष अर्कसाली, अनंत पावशे, संचालिका रूपा साखरे, शितल शंभुचे, सेक्रेटरी मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक राजू मुतकेकर, संतोष लासे, पल्लवी कणबरकर, संगीता कुंडेकर, भरमा बेळगावकर आदी उपस्थित होते,
Belgaum Varta Belgaum Varta