Thursday , March 5 2026
Breaking News

शांतीनगर-टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा

Spread the love

बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नगरसेवक आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पी. एन. बेळिकेटी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख वक्ते वाय. पी. नाईक यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास विषद केला. हर घर तिरंगा या अभियानातुन देशातील प्रत्येक नागरिकांना आपण भारतीय आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो. पंचाहत्तर वर्षांत आपण शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली आहे.
देशासाठी बलिदान ज्या हुतात्मयानी दिले त्यांचे स्मरण नागरिकांच्या मनात आहे. क्रांतीकारकांनी इंग्रज सरकारला हाकलून लावले. एकजुटीच्या जोरावर विविधता असणारी आपली संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाहीमार्गाने चालवली जाणारी आपली राज्यघटना सर्वांना समान न्याय मिळवून देते. नागरिक वंचित रहाणार नाही सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम शासनाचे आहे, असे विचार व्यक्त केले
याप्रसंगी बी.आर.नायकर, तात्यासाहेब पाटील, दयानंद भेंडीगेरी, विजय खरे, नारायण आपटेकर, डी.वाय.पाटील, प्रसाद कुलकर्णी, विलास बसरीमरद, प्रसना कबूर, बळवंत राजाई, रायकर, पट्टणशेट्टी, सौ. सुमन दळवी, भारती नाईक, सविता खरे, संजीवनी हिरेमठ, नंदिनी पाटील, प्राजक्ता शानभाग, सुमेधा काळे, विद्या पाटील, आतार सर, कांचन बनसकर, मंगला बेळिकेटी, मयुरी राजाई, मंजुळा नवले आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *