Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर – वडगाव मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 च्या सुमारास येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरील बेळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर घडली.

येळ्ळूर येथील चंद्रकांत पारीस कांबळे (वय 24) असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो येळ्ळूरकडून वडगावच्या येळ्ळूर के एल ई इस्पितळाकडे येत होता त्यावेळी हा अपघात झाला आहे.
सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास हि घटना घडली असून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऍक्टिव्हावरून जाणाऱ्या इसमाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

गाडी घसरून रस्त्याच्या शेजारी पडलेल्या इसमाने हेल्मेट न घातल्याने त्याचे डोके फुटले आहे. हा अपघात इतका भीषण होता कि यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात या घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *