Monday , September 21 2026
Breaking News

हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा येथे करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेचे सहशिक्षक रामू मोरे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिंताचे स्वागत केले. शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्ष सुजाता कामाणाचे, स्नेहल सामजी, आशा संताजी, सुजाता संताजी, रेखा हनमंताचे, गीता हनमंताचे, सविता कालिंग, अन्नपूर्णा शिंदे, यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मनोहर संताजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. यानंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे व समूहगीत झाले. यानिमित अनेक विद्यार्थ्यांनी अनेक थोर पुरुषांचे, समाज सुधारकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, वेशांतर करून आलेल्यांचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर संताजी म्हणाले की, भारत देशाला हजारो वर्षांची परंपरा आहे. या देशावर अनेक राजे महाराजे यांनी राज केलेले आहे. रामराज्य, बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज अशा राजानी चांगले राज्य देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा या भारत देशाला 18 व्या शतकात चांगले नेतृत्व नसल्यामुळे देश परतंत्र्यात गेला होता. तो देश पुन्हा स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकाने आपल्या प्राणांची बाजी देऊन 15 ऑगस्ट 1947 दिवशी देश स्वातंत्र्य केलेला आहे. आज देशाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत या सर्व क्रांतिकारकांच स्वातंत्र्यवीरांचे आजच्या दिवशी त्यांना मानवंदना देणे हे आमचे कर्तव्य आहे. व हा देश जगामध्ये एक चांगला देश व्हावा यासाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य संभाजी हनमंताचे, धाकलू बिळगोजी, सागर बिळगोजी, अरुण बिळगोजी, सुग्रीव कामती, बाळाराम कामती, पिराजी जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य गणपत मारिहाळकर, सागर कामाणाचे, नजीर मुल्ला, तवनाप्पा पायाका, विलास परीट, किरण हनमंताचे, मलापा कालिंग, ज्योतिबा मोरे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील, सहशिक्षक एम व्ही चौगुले, एम ए देसाई, एस बी भोसले, आर एम घोरपडे, ए एस बागेवाडी, एस बी सफारे,रामू मोरे, ए एच लंगोटी, व्ही जी गाठिबांधे,आदी उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांना मनोहर संताजी, ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष गणपत मारिहाळकर, तरुण युवक मंडळ लक्ष्मी गल्ली, गणेशोत्सव मंडळ गजानन चौक नवी गल्ली, किरण हनमंताचे, राष्ट्रप्रेमी युवक मंडळ नवी गल्ली, शिवशक्ती युवक मंडळ नवी गल्ली, यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *