बेळगाव : आज संपूर्ण देशात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत सर्वच जण अतिशय उत्साहाने आज हा दिन साजरा करताना दिसत आहेत.
हाच उत्साह राजकीय पक्षांमध्ये देखील दिसून येत आहे. आम आदमी पार्टी बेळगावतर्फे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यात लहान मुलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीर पुरुषांचे वेशभूषण करून स्वातंत्र्यसंग्रामात बळी पडलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून घोषणा देण्यात येत होत्या त्यामुळे शहरात नवचैतन्य निर्माण होताना दिसून येत होते.
या पदयात्रेची सुरुवात चन्नम्मा सर्कल येथून झाली तर याची सांगता धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात आली.
ह्याचे औचित्य साधून ऍड. पूजा संजय काकतकर यांच्यातर्फे वार्ड नंबर 54 मधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
या पदयात्रेसाठी लहान थोरांबरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक, महिलावर्ग, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, पार्टीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta