
बेळगाव : ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा बक्षीस वितरण आणि सोने की चिडिया सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या ’हा माझा धर्म पशू बचाव दल’तर्फे वारकरी वेशभुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी विष्णू आनंदाचे, राजू राऊत आणि सुरज पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले. तसेच उदय नागवडेकर यांनी सर्व विजेत्यांना चषक दिले. वैजनाथ श्रीनाथ पाटील (कंग्राळी खुर्द), प्रणवी प्रशांत माळवी (खासबाग) आणि वल्लभ संदीप शिंदे (महागाव, गडहिंग्लज) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सोने की चिडिया या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. भारतीय सैनिकांना समर्पित करणारी नृत्य सादर करण्यात आली. त्याचबरोबर वारकरी सांप्रदाय भजन, कव्वाली आणि धनगरी भजनाचे सादरीकरण करण्यात आले. योगा आणि तायक्वांडोची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta