बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्यावतीने श्री कृष्णा जन्माष्टमीचे औचित्य साधून शुक्रवार दि. 19/8/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता गणेश मंडळाची मुहुर्तमेढ भटजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पुजा करून रोवण्यात आले. यावेळी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक आप्पाजी कुंडेकर यांच्याहस्ते पुजा करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे, संतोष कणेरी, परशराम कोकितकर, सुधाकर कडोलकर, अशोक खवरे, परशराम बेकवाडकर, शंकर नाडगौडा, पराग देशपांडे, गिरीश कणेरी, राजू मराठे, बंडू जाधव, मनोज पवार, आनंद नाईक, तसेच गल्लीतील महिला, नागरिक,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta