Thursday , March 5 2026
Breaking News

शिरगुप्पीजवळील मुळवाड येथे बिबट्याचे दर्शन

Spread the love

मुळवाड : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक बिबट्या आढळून आला असून संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे.
कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीजवळील मुळवाड येथील शेतात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसला. प्रशांत पाटील नावाचा शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याला पाहून घाबरून पळून आला.

शेतकऱ्याने येऊन सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जाऊन खात्री केली असता तिथे पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. गावातील शेतात बिबट्या दिसला असून शेतात जाणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी.
काही दिवसांपूर्वी जवळच चांदूर येथे बिबट्या दिसल्याने दहशत निर्माण झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *