बेळगाव : बेळगाव पदवीपूर्व शिक्षण खाते उपनिर्देशक (डीडीपीयुई) व नायकर सोसायटी यांचे रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रिडास्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिडास्पर्धामध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजमधून एकूण 196 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सांघीक खेळामध्ये मुलीच्या थ्रो बॉल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. कब्बडीमध्ये कु. भगत अकणोजी या विद्यार्थ्याने व कु. पायल या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
मुलांच्या खो-खो संघानेही द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडी व ट्रिपल जंपमध्ये कु. मलप्रभा पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना मराठा मंडळच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य श्री. एस. एस. पाटील व क्रिडा शिक्षक श्री. चंद्रकांत गोमाण्णाचे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta