Thursday , March 5 2026
Breaking News

बिबट्याच्या शोधार्थ पुन्हा मोहीम सुरु

Spread the love

 

बेळगाव : बिबट्याला जेरबंद पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सकरेबैल येथून 2 हत्ती दाखल झाले. त्यांच्या सहाय्याने आज सकाळपासूनच बिबट्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
गेल्या 20 दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात असलेल्या आणि बेळगावकरांची झोप उडवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता हत्तीची मदत घेण्यात येत आहे. आज बुधवारी सकाळी शिमोगा येथील सकरेबैल येथून दोन हत्ती आणण्यात आले. त्यांच्या मदतीने सकाळपासूनच ऑपरेशन बिबट्या सुरु करण्यात आले.
बिबट्याला पकडण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. विनय यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या पथकाने सकरेबैलू कॅम्पमधील ‘अर्जुन’ आणि ‘आले’ या हत्तींना प्रशिक्षण दिले आहे. आता वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर आणि माहुतांसह आठ जणांची टीम या ऑपरेशनमध्ये सहभागी झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *