बेळगाव : यमकनमर्डी भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली जिल्हापंचायत भागातील गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.
कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला की भागातील किती लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. किती अजून बाकी आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून त्यांनी माहिती सुद्धा घेतली. आपला मतदारसंघ मुक्त करण्यास निर्धार आमदारांनी केला.
कडोली, अगसगे, हंदिगनूर, मन्नीकेरी, गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये सभा घेऊन गावातील समस्या जाणून घेतल्या. तसेच या समस्या लवकरात लवकर सोडून देण्याचे आश्वासन आमदार सतीश जारकीहोळी यांनी जनतेला केले. याआधीही या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. सध्या काही विकास कामे चालू आहेत. येणार्या काळामध्ये यमकनमर्डी मतदारसंघाला आदर्श मतदारसंघ बनणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलगोडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू मायाण्णाचे, त्याचप्रमाणे इतर ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …