मुरगोड : मुरगोड पोलीस स्टेशन हद्दीतील घर व खाजगी बँक चोरी प्रकरणी मुरगोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 10 ग्रॅम सोने, 1.10 किलो चांदीची नाणी व रोख रक्कम असा एकूण 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. मुरगोड पोलिसांनी यरगट्टी शहरातील किराणा दुकान, खाजगी बँक आणि बेनकट्टी गावातील एमएसआयएल बारमधील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आंतरराज्य कुख्यात चोरट्याला अटक केली असून त्याच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी त्याच्याकडून 48,000/- किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे दागिने, 70,000/- रुपये किमतीचे 01 किलो 10 ग्रॅम वजनाची चांदीची नाणी आणि किरकोळ रुपये 2000/- आणि एक लोखंडी रॉड जप्त केला. त्याच्यासोबत चोरी करणारे अन्य दोन आरोपी फरारी आहेत. सदर आरोपी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
रामदुर्ग उपविभाग डीएसपी रमणगौडा हत्तीचे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुरगोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मौनेश्वर माळी पाटील नेतृत्वाखाली मुरगोड पोलिस स्टेशनचे पीएसआय बसगौडा नेर्ली, कुमारी लक्ष्मी बिरादार, कर्मचारी के. बी. अलगरावुत, व्ही. डी. सक्री, एम. बी. सन्नानायक, ए. व्ही. जुट्टणवर, बी. एस. अंतरगट्टी, आय. एस. वकुंड, सुरेश हुंबी, रमेश ससालट्टी आणि एच. आर. न्यामागौडा यांच्या पथकाने हे प्रकरण शोधून काढले.
Belgaum Varta Belgaum Varta