
बेळगाव : “बेळगांव वार्ता”तर्फे ‘आकर्षक गणेश मूर्ती’ तसेच ‘आकर्षक सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण तसेच खानापूर या चार विभागात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल. गणेश मूर्ती आणि देखावा घरगुती असावी तसेच आकर्षक गणेश मूर्ती व आकर्षक गणेश देखावा या दोन्ही स्पर्धेसाठी वेगवेगळी प्रवेश शुल्क असेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9731480108 या नंबरवर गणेश मूर्ती आणि सजावटीचे फोटो पाठवावेत, असे आवाहन “बेळगाव वार्ता”चे संपादक सुहास हुद्दार यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta