बेळगाव : 26 ऑगस्ट हा दिवस “महिला समानता डे” म्हणून साजरा केला जातो. आधुनिक काळातील स्त्री ही स्वतंत्र आहे. आज ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते आहे. आज तिला समाजात मान ही मिळालेला आहे. आजची स्त्री सुपरवुमन बनली आहे. आज स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने समानता प्राप्त झाली आहे. पण, अजूनही काही लोक आहेत ज्यांना समाजात समानता मिळाली नाही आहे. आज त्याच लोकांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी प्राईड सहेलीने एक पाऊल उचलले आहे. प्राईड सहेलीच्या माध्यमातून ट्रान्स जेंडर यांचा सत्कार आरटीओ सर्कल येथील मानवता ऑफिसमध्ये संपन्न झाला.
आज या ऑफिसमध्ये 25 जण होते. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या उपस्थितांसोबत मनमोकळी चर्चा करण्यात आली. त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यांना स्नॅक्स आणि स्वीट देण्यात आले. भविष्यकाळात “त्या” उपेक्षितांना समाजात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे मत प्राईड सहेलीच्या अध्यक्षा आरती शहा यांनी व्यक्त केले. तसेच यांच्यासाठी कुणाला मदत करायचे असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असेही आरती शहा यांनी सांगितले आहे.
कार्यक्रम सूत्रसंचालन ट्रान्स जेंडर किरण बेदी यांनी केले. श्रेया, राधा, अर्चना, जबीन, मिलिंद, अमोल, शिवा असे 25 जण उपस्थित होते.
सहेलीच्या शीतल शहा, नीता बिडगर व इतर सदस्य उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta