बेळगाव : भारत नगर, शहापूर येथील बाजार रोड (मुख्य रस्ता) वरील धोकादायक अवस्थेत असलेल्या कदम चाळेचा उत्तरेकडील भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, जीर्ण इमारतीचा कोसळलेला भाग नजिकच्या अनिल पाटील त्यांच्या घरावर पडून घराचे पत्रे फुटून नुकसान झाले. शिवाय पान टपरीचेही पत्रे फुटून नुकसान झाले.
पाटील कुटुंबातील महेश पाटील हा तरुण शरीराने अपंग असून उदरनिर्वाहासाठी तो पान टपरी चालवतो. पान टपरीवरील पत्र्याचे नुकसान झाल्याने त्याच्यासमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पाटील कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी तसेच महेश पाटील या अपंग तरुणाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta