बेळगाव : ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी उद्या शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गावांमध्ये विद्युत अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या विजेच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी ऊर्जा विभाग, हुबळी वीज पुरवठा कंपनी/हेस्कॉम यांच्या वतीने दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी बेळगाव मंडळात विद्युत अदालत घेण्यात येते. त्यानुसार शनिवारी सकाळी 11.00 वाजता बेळगाव सर्कलमधील निवडक ठिकाणी होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांना प्रतिसाद देण्यासाठी आणि तत्काळ निराकरण करण्यासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजनांपैकी ही एक आहे. बेळगाव सर्कल अंतर्गत बेळगाव ग्रामीण तालुक्यात येणारी मारिहाळ, बुड्यानूर, गुऱ्यानट्टी, बेनकनहळ्ळी, काळेनट्टी, सुसागनट्टी, बेंडीगेरी या गावात तसेच खानापूर तालुक्यातील अवरोळी, दिग्गेगळी, शेलाटवाडी, हरसनवाडी, सुपुर केरवाड या गावात, हिरेमेळ, कडसगट्टी, चिवटगुंडी या बैलहोंगल तालुक्यातील गावात विद्युत अदालत होणार आहे. त्याचप्रमाणे कित्तूर तालुक्यातील देगलोळी आणि मार्गनकोप्प, रामदुर्ग तालुक्यात दोड्डाहंपीहोळी, उदपुडी, तोटगट्टी, उमतारयेथे, सौंदत्ती तालुक्यात दुंडनकोप्प, करिकट्टी, मुगळीहाळ, हंचिनाळ येथे, गोकाक तालुक्यात शिवपुर, राजनकट्टी, यद्दलगुड्ड, पामलदिन्नी, सज्जीहाळ येथे तसेच मुडलगी तालुक्यातील बिसनकोप्प, खानट्टी, सदरी या गावांमध्ये विद्युत अदालतच्या माध्यमातून ग्रामीण वीज समस्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, असे हेस्कॉमचे अधीक्षक अभियंत्यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta