बेळगाव : भारताचे तेजस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव ग्रामीणमधील पश्चिम भागातील बेळगुंदी येथील सरकारी दवाखान्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मराठा समाजाचे नेते बेळगाव भाजपा ग्रामीण मंडळ माजी अध्यक्ष विनय विलास कदम व बेळगाव ग्रामीण स्वच्छता संघाच्यावतीने हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी ग्रामीण स्वच्छता संघांचे पांडुरंग निंगनुरकर, महेश जाधव, लक्ष्मण गावडा, गणपत चव्हाण, महेश सुतार, राहूल वरपे, तसेच भारतीय जनता पार्टीचे बेळगुंदी भागातील नेते सुनील पाटील, देवाप्पा शिंदे, सूर्यकांत चौगुले, परशराम शिंदे, तसेच मराठा संघटन अध्यक्ष नारायण झंगरुचे, जनरल सेक्रेटरी अमोल जाधव, मोनाप्पा भास्कळ, सुभाष पाटील यल्लाप्पा झंगरुचे, नारायण कांबळे, शंकर सांबरेकर, राजू कंग्राळकर (कोनेवाडी), सुरज पाटील, रवळू बगिले, कामगार संघटन अध्यक्ष प्रशांत हलकर्णीकार, मारुती हलकर्णीकार, शिवप्रसाद पाटील, बाळू पाटील, कल्लाप्पा पाटील, असे राकस्कोप, यळेबैल, सोनोली, बिजगर्णी, बडस, बाकनूर आदी खेड्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta