बेळगाव : अलिकडे जनावरांना लंम्पी रोगाची लक्षण जोरात सुरु असून तो सांसर्गिक रोग असल्याने झपाट्याने फैलावत आहे. ग्रामीण भागात थैमान घातल्याने चांगली जनावरे दगावत आहेत असे समजते.
शहरी भागातही सुरु झाल्याने शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास लम्पी स्किनवर नक्कीच ताबा मिळवू शकतो. त्यासाठी आपला गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात डास, माशा येऊ न देणे, सकाळ संध्याकाळ कडूनिंबाच्या पाल्याची धुरी देणे, गोठ्यात जाणार्या व्यक्तीनेही कायम स्वच्छता बाळगण्याबरोबरच इतरांवर रोगाचा फैलाव होऊ नये याची काळजी घ्यावी.
जर आपल्या जनावरांना ताप, शरिरावर गाठी, चारा खात नसतील किंवा इतर लक्षणे दिसत असतील तर ते जनावर बाजूला बांधून ताबडतोब संबंधित जनावरांच्या दवाखान्यात कल्पना द्यावी, असे जिल्हा पशुसंगोपनच्या डॉक्टरांनी आवाहन केले आहे.
तेंव्हा शेतकरी बंधूंनो घाबरुन न जाता लम्पी स्किन रोग न येण्यासाठी जाणिवपूर्वक लक्ष द्या, अशी कळकळीची विनंती.
Belgaum Varta Belgaum Varta