हिंडलगा : हिंडलगा येथील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या गोडाऊनचा स्लॅब शुभारंभ दि. 21 रोजी संघाचे चेअरमन रमाकांत वाय. पावशे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम व्यवस्थापक उत्तम शिंदे यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. संचालक अशोक वाय. पाटील, भागाण्णा नरोटी, सुरेश अगसगेकर, विलास नाईक, महादेव राक्षे, पापुल
किल्लेकर, धर्मेंद्र खातेदार, मोहन नाईक, आण्णाप्पा नाईक, पार्वती कोकितकर उपस्थित होते.
प्रथम व्हा. चेअरमन जयश्री पावशे यांच्या हस्ते मशिनचे पूजन करण्यात आले. यावेळी या कामाचे ठेकेदार श्रीकांत जाधव व संदीप मोरे यांचा अध्यक्षांच्या हस्ते शाल व पुष्पमाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सल्लागार विनायक पावशे यांनी मनोगत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यंकटेश देवगेकर यांनी केले. शेवटी आभार राजू कुपेकर यांनी मानले. कार्यक्रमाला सभासद सल्लागार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta