बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अखंड जयघोष आणि गजरात येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
आज दुर्गामाता दौडच्या चौथ्या दिवशी येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारजांच्या पुतळ्याचे पूजन करून दौडचे उद्घाटन करण्यात आले. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांच्या हस्ते दौडीचे पूजन करून दौडीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. मशाल, तलवार धारक, ध्वज धारक हे दौडीच्या अग्रस्थानी होते. तरुणांसह बालचमुही दौडीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, हिंदवी स्वराज्य संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच गावातली नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta